अहमदनगरमध्ये गाळे विक्रीत फसवणूक

हरिभाऊ डोळसे यांचे मोची गल्ली येथे कापड दुकान आहे
Fraud
Fraud esakal

अहमदनगर : शहरातील मोची गल्लीत विक्रीस निघालेल्या तीन गाळ्याचे नोव्हेंबर २०१४ मध्ये साठेखत करून पाच लाख रूपये घेऊन सुमारे आठ वर्ष खरेदी देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक हरिभाऊ बाबुराव डोळसे (वय ६२, रा. जुना बाजार, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मुरलीधर मोरन्दमल लुल्ला (वय ५८ रा. सदर बाजार, भिंगार) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ डोळसे यांचे मोची गल्ली येथे कापड दुकान आहे. दुकानाचे शेजारी कल्पतरू शॉपिंग आर्केट बी विंग अपार्टमेंन्टमध्ये तीन गाळे आहेत. लुल्ला यांनी हे गाळे विक्री करण्याकरीता काढले असल्याने डोळसे यांनी तीन गाळे एक कोटी रूपयास घेण्यासाठी तयार झाले. डोळसे व लुल्ला यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी अ‍ॅड. विजय मुनोत यांच्याकडे साठेखत केले होते. सहा महिन्यानंतर व्यवहार झालेली रक्कम व वरील मिळकतीची खरेदी करून देईल, असे १०० रूपयांच्या मुद्रकावर प्रतिज्ञा पत्र लिहून दिले.

त्यावेळी डोळसे यांनी दोन लाख रूपये रोख दिले व स्टेट बँक ऑफ इंडियाचा तीन लाखांचा धनादेश असे एकूण पाच लाख रूपये दिले होते. डोळसे यांनी दिलेला धनादेश वटलेला असून लुल्ला यांनी ते पैसे काढून घेतले होते. अद्यापपर्यंत खरेदी देण्यास टाळाटाळ करून वेळ काढूपणा केला. डोळसे यांनी अखेर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार नितीन गाडगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com