
कोरोना या संसर्गरोगामुळे अनेक विकास कामे थांबली आहेत. जिल्हा परिषदेचा निधी कोविडसाठी वळविला गेला असतांना देखील आपल्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.
शेवगाव (अहमदनगर) : कोरोना या संसर्गरोगामुळे अनेक विकास कामे थांबली आहेत. जिल्हा परिषदेचा निधी कोविडसाठी वळविला गेला असतांना देखील आपल्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. सर्वांनी एकजूट होऊन विकास कामासाठी एकत्र आले पाहिजे. तरच गावचा विकास होईल व कामही दर्जेदार होईल, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी काकडे यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या विकास निधीतून राणेगाव ते आधोडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन राणेगाव येथे जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसाराम तिडके होते. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, राजू फकीर, उपअभियंता एस.आर शिदोरे, भागवत रासनकर, देवराव दारकुंडे, सचिन आधाट, सरपंच रमेश जाधव, भाऊसाहेब मासाळ, भाऊसाहेब बर्डे, आबासाहेब काकडे आदी प्रमुख उपस्थित होते.
अँड. काकडे म्हणाले, डोंगर पट्टयाकडे लोकप्रतिनिधींचे कायम स्वरुपी दुर्लक्ष झाले आहे. पूर्वी या भागात विकास कामे कमी व हाणामारीच जास्त व्हायची. ती गुन्हेगारी आम्ही संपुष्टात आणली. दहशत मुक्त हा गट आम्ही केला असून विकास कामावर भर दिला आहे. त्यामुळे जनतेचे प्रेम आम्हाला मिळाले आहे.
हर्षदा काकडे म्हणाल्या की, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची मोठी मागणी होती. ती पूर्ण केल्याचा आनंद होतोय. हा रस्ता चांगल्या स्वरूपाचा व्हावा यासाठी तुम्ही सहकार्य करा. मी जास्तीत जास्त निधी देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. जो निधी येतो तो प्रत्येक गावात देण्याचा प्रयत्न करते.
यावेळी भाऊसाहेब पोटभरे, नाना चेमटे, भुजंग चेमटे, भारत लांडे, बाबासाहेब अडसरे, भगवान तिडके, भानुदास गुंजाळ, अंबादास गाढवे, बाबासाहेब भाबड, अशोक वाघ, नारायण गाढवे, जनार्दन खेडकर, एकनाथ खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आंधळे तर सूत्रसंचालन नवनाथ खेडकर यांनी केले. तर शंकर गाढवे यांनी आभार मानले.
संपादन : अशोक मुरुमकर