जामखेड येथील उत्तम पवार यांनी कार्यकर्त्यांसह गुरुकुल मंडळात प्रवेश केला. त्यांच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कळमकर बोलत होते. समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, माणिक जगताप, विजय महामुनी, सुभाष धामणे उपस्थित होते.
नगर ः ""जिल्ह्यातील काही तालुक्यांत, शैक्षणिक पात्रता नसताना ठरावीक शिक्षकांना केंद्रप्रमुखांचे अधिकार दिले आहेत. किमान बी.एड. पात्रता अपेक्षित असताना डी.एड.धारक शिक्षक केंद्रप्रमुखांचे अधिकार वापरून केंद्रातील शिक्षकांना दबावात ठेवत आहेत.
प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांच्या शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम होत आहे,'' असा आरोप सांस्कृतिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. संजय कळमकर यांनी केला.
जामखेड येथील उत्तम पवार यांनी कार्यकर्त्यांसह गुरुकुल मंडळात प्रवेश केला. त्यांच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कळमकर बोलत होते. समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, माणिक जगताप, विजय महामुनी, सुभाष धामणे उपस्थित होते.
डॉ. कळमकर म्हणाले, ""जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. काही तालुक्यांत त्यांचे अधिकार विस्तार अधिकारी किंवा शेजारील केंद्रातील केंद्रप्रमुखांकडे दिले आहेत. मात्र, काही ठिकाणी उच्चशिक्षित शिक्षक असूनही, कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शिक्षकांकडे प्रभारीपदे दिली आहेत.
कनिष्ठ शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक हे मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे गोपनीय अहवाल कसे भरू शकतात? प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन कार्यवाही करावी.''
उत्तम पवार यांच्यासह विनोद सोनवणे, सुशील पौळ, जितेंद्र आढाव, राजेंद्र साठे, जालिंदर यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुकुल मंडळात प्रवेश केला.
संपादन - अशोक निंबाळकर