esakal | सराईत चोरट्यांची टोळी मुद्देमालासह गजाआड; श्रीरामपूर पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

The gang of thieves arrested in shrirampur

सराईत चोरट्यांची टोळी मुद्देमालासह गजाआड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : सराईत दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात श्रीरामपूर शहर पोलिस पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दहा चोरी गेलेल्या दुचाक्यासह एक टेम्पो चोरट्यांकडुन जप्त केला. पोलिसांनी आरोपींची कसुन चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने दुचाक्या चोरी केल्याची माहिती उघड झाली.

गुप्त माहितीवरून पोलिसांनी लावला सापळा

चोरीची दुचाकी घेवून सराईत आरोपी योगेश रमेश हिवाळे (रा. पढेगाव) हा विक्रीसाठी श्रीरामपुरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरिक्षक संजय सानप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावुन त्याला ताब्यात घेत त्याच्याकडुन (एमएच २० सीबी ९१२२) व (एमएच १७ एके ०६५०) क्रमांकाच्या दोन चोरीच्या दुचाक्या जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राघु शिंदे (वय २३, रा मुलनमाथा, पिपंळाचा मळा, राहुरी), जावेद बशिर सय्यद (वय २८, रा. राहुरी), रामनाथ वसंत गायकवाड (रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) असे अन्य आरोपीचे नावे असून त्यांनी विविध ठिकाणी वाहन चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करुन त्याच्याकडुन दहा चोरीच्या दुचाकींसह एक टाटा झिप टेम्पो जप्त केले आहे.

हेही वाचा: डिंभे-माणिकडोह बोगदाप्रश्नी शरद पवारांनी घातले लक्ष; लवकरच बैठक

विविध तालुक्यात यांच्यावर गुन्हे दाखल

वरील आरोपी सराईत चोरटे असुन त्यांच्या विरुध्द शिर्डी, राहुरी, मनमाड पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या दुचाक्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे (एमएच १६ आर ९७०७), (एमएच २० सीबी ९१२२), (एमएच १७ एके ०६५०), (एमएच १६ एन ७१८२), (एमएच १७ एपी ६५२६), (एमएच १७ आर ४६८३) यांच्यासह आणखी तीन विना क्रमांकाच्या दुचाक्या चोरट्यांकडुन पोलिसांनी जप्त केल्या आहे. तसेच (एमएच १७ ईजी २०८९) क्रमांकाचा टाटा झिप टेम्पो जप्त केला आहे.

हेही वाचा: पर्यटकांना खुणावतोय निसर्गसौंदर्याने नटलेला रामेश्‍वर धबधबा

loading image
go to top