शेलारांभोवतीच्या गर्दीचा अनेकांना धसका; निवडणुकीची तयारी जोरदार

Ghanshyam Shelar
Ghanshyam Shelaresakal

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार पुढच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत. तालुक्यात कुठलीही सत्ता नसताना, सामान्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांचा हा प्रयत्न सुरू असून, कामे घेऊन येणाऱ्यांची त्यांच्याकडे होणारी गर्दी कारखानदार असणाऱ्या भावी आमदारांच्या अडचणी वाढविणारी आहे.

पुढच्या निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू

गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन वेळी शेलारांना उमेदवारी दिली. पस्तीस वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या शेलारांकडे तालुक्यातील कुठलीही सत्ता नाही अथवा मोठी संस्थाही नाही. मात्र, दांडगा लोकसंपर्क त्यांची जमेची बाजू आहे. विधानसभेला तत्कालीन आमदार राहुल जगताप यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, दोघांनीही ऐन वेळी नकार दिल्याने उमेदवारीची माळ शेलारांच्या गळ्यात पडली आणि त्यांनी त्याचे सोने केले.
पुढच्या निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू केली आहे. कुठलीही सत्ता नसताना सामान्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांचा हा प्रयत्न सुरू असून, कामे घेऊन येणाऱ्यांची त्यांच्याकडे होणारी गर्दी कारखानदार असणाऱ्या भावी आमदारांच्या अडचणी वाढविणारी आहे. शहरात शेलार यांनी नवे कार्यालय सुरू केले आणि तेथे लोकांची कामासाठी होणारी गर्दी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांचे कार्यालय अनेक वर्षे लोकांसाठी आधार आहे. सरकारी कार्यालयांतील कामे तेथून होत होती. मात्र, त्यांची तब्येत साथ देत नसल्याने ते तेथे थांबत नाहीत. त्यामुळे लोकांना शेलारांचा पर्याय मिळाला असून, त्यातच राज्यात सत्ता असल्याने सरकारी यंत्रणेकडून कामे करून घेणे सोयीचे होते.

Ghanshyam Shelar
कर्जमाफी किती मिळणार? योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

कामे करून घेणारा नेता जवळचा

तालुक्यातील अनेक नेते लोकांच्या संपर्कात असले, तरी सहजासहजी उपलब्ध होणारा व थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे करून घेणारा नेता लोकांना जवळचा वाटतो. तालुकापातळीवर काम करणारे बहुतेक नेते शहराच्या बाहेर राहतात. सरकारी कार्यालये शहरात असल्याने व स्वतःचे कार्यालय असल्याने सध्या शेलार यांच्याकडे गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुढची निवडणूकही ते याच मुद्द्यावर लढू शकतात, असा अंदाज आहे.

Ghanshyam Shelar
Ahmednagar | एक रकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com