
पाटील यांचे योगदान कायमच स्मरणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, स्व. जयंत ससाणे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात जी. के. पाटील यांचा मोलाचा वाटा होता.
श्रीरामपूर ः जी. के. पाटील यांच्या निधनाने परिपक्व काॅंग्रेसी नेतृत्व हरपल्याचा शोक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. येथील काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते जी. के. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
या वेळी आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार डाॅ. तांबे म्हणाले, जी. के. पाटील यांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले. अनेक महत्वपूर्ण विषयांमध्ये पाटलांनी योग्य ते निर्णय घेऊन एक दिशा दिली. त्यामुळेच आपण परिपक्व नेत्याला मुकलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार कानडे म्हणाले, जी. के. पाटील आपल्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून काम करत होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रमाणे ते कायमच कार्यरत राहिले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारे त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला.
पाटील यांचे योगदान कायमच स्मरणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, स्व. जयंत ससाणे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात जी. के. पाटील यांचा मोलाचा वाटा होता. मोठ्या भावाप्रमाणे ते स्व. ससाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तीच साथ आणि आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, बाबासाहेब कोळसे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी जेष्ठ नेते रामशेठ वलेशा, रमण मुथा, काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबाबसाहेब दिघे, आणासाहेब थोरात, सुधीर नवले, राजेंद्र पाउलबुद्धे, अशोक पवार, नगरसेवक दिलीप नागरे, मुज्जफर शेख, रितेश रोटे, मनोज लबडे उपस्थित होते.
.............