41 विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! संगमनेर तालुक्यातील ‘अमृतवाहिनी'च्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड 

आनंद गायकवाड
Sunday, 20 December 2020

अमृतवाहिनी पॉलिटेक्‍निकच्या 41 विद्यार्थ्यांची टाटा व एल. अँड टी. कंपनीत थेट नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना संकटातील लॉकडाउननंतर पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेल्या उद्योग क्षेत्रात अमृतवाहिनी पॉलिटेक्‍निकच्या 41 विद्यार्थ्यांची टाटा व एल. अँड टी. कंपनीत थेट नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी दिली. 

अमृतवाहिनी संस्थेतील प्लेसमेंट विभागातर्फे देशातील विविध कंपन्यांशी सातत्याने समन्वय ठेवून, परिसर मुलाखतींचे आयोजन केले जाते. मागील वर्षी टाटा मोटर्स, एल क्‍यूब इनोव्हेशन (चेन्नई), ओएस इन्फोटेक (ठाणे), डेसकेरा (पुणे), आयसीआयसीआय प्रुडेंशियल (पुणे), तसेच टीसीएस, ऍमेझॉन, एफएसएस, कादंबरी स्टील, आयसीआय प्रुडेन्शिअल, प्रा. क्‍लर्क्‍स प्रा. लि., ऍक्‍सिस बॅंक, गॅलॅक्‍सो स्मिथ, डेटामॅट्रिक्‍स, पारले ऍग्रो, व्हेलॉक्‍स बिझनेस सोल्यूशन्स, सह्याद्री ऍग्रोव्हेट यांचा त्यांत समावेश होता.

यातून लॉकडाउननंतर 382 विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली होती. नुकतीच टाटा मोटर्स कंपनीत मेकॅनिकल विभागाच्या 10, तर लार्सन अँड टुब्रो (तळेगाव दाभाडे, पुणे) या कंपनीत 19 व इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या 12 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for 41 students in Sangamner taluka

टॉपिकस
Topic Tags: