Continue Rain
Continue Rain sakal

राजूर परिसरावर पावसाची कृपादृष्टी

अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अकोले : भंडारदरा पाणलोटक्षेत्रात आज (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढणार आहे. राजूरला विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊन भातखाचरे भरल्याने आवणीच्या कामाला वेग आला आहे.

भंडारदरा पाणलोटात गुरुवारपासून पाऊस सुरू झाला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र पावसाने जोर धरला नव्हता. काल (ता. २४) सायंकाळी पाच वाजेपासून पावसास सुरवात झाली. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरला. पाऊण तास जोरदार सरी कोसळत होत्या. नंतर काही काळ पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री पावणेदहानंतर पुन्हा पावसाने जोर धरला. या पावसामुळे डोंगरदऱ्यांतून धबधबे वाहू लागले आहेत. ओढे-नाले खळखळू लागले असून, धरणात विसावू लागले आहेत.

आज पाऊस टिकून होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वीज पडल्याने राजूर गाव अंधारात होते. महावितरणने पर्यायी व्यवस्था करून काही काळ वीजपुरवठा सुरू केला. अकोले शहर व तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चोवीस तासांचा पाऊस (कंसात एकूण पाऊस)

मागील चोवीस तासांत भंडारदरा परिसरात सात (१२१), घाटघर- नऊ (३१९), पांजरे- नऊ (१६०), रतनवाडी- सात (३५१), वाकी- तीन (७६) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com