
सोनई : ‘आळंदी’ आणि ‘देहू’च्या धर्तीवर नेवासे ते पंढरपूर आषाढी पायी वारीकरिता सज्ज झालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यास भक्तगणांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. प्रस्थानपासून अहिल्यानगरपर्यंत दिंडीतील सर्व सहभागी वारकऱ्यांना सामूहिक चहा, नाश्ता व दोन्ही वेळचे अन्नदान देणाऱ्या पंगती निश्चित झाल्या आहेत. आज संत ज्ञानेश्वर पैसखांब मंदिरात झालेल्या बैठकीत नियम, अंतिम नियोजन, पंगतीचे स्वरूप व सहभागी दिंड्यांना क्रमांक देण्यात आला.