
नेवासे शहरातील राम मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत गुरुवर्य भास्करगिरी महाराज बोलत होते.
नेवासे (अहमदनगर) : प्रभू श्रीराम ही राष्ट्रीय देवता असून होणारे मंदिर राष्ट्रीय देवतेचे मंदिर होणार आहे. त्यामुळे सर्व जातीधर्माच्या लोकांचे दायित्व यासाठी आवश्यक आहे. निधी संकलनाच्या माध्यमातून होणाऱ्या रामकार्याला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावे, असे आवाहन क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नेवासे शहरातील राम मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत गुरुवर्य भास्करगिरी महाराज बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख, हभप नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, उत्तर नगर जिल्हा राष्ट्रीय संघ चालक भरतकुमार निमसे, नेवासे तालुका संघचालक अनंत नळकांडे उपस्थित होते.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
प्रास्ताविक स्वप्नील पोतदार यांनी केले तर संतपूजन कृष्णा डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक गुगळे, शंकरराव नळकांडे, सतीश मुळे, सुनिल वाघ, अरविंद मापारी, निखील शिंगवी, राजेंद्र मापारी, विश्वनाथ नानेकर उपस्थित होते.
दोन लाखाचा निधी जमा
राम मंदिर निधी संकलन अभियानाच्या नियोजन बैठकीतच स्मिती व दत्तात्रेय देशपांडे या दाम्पत्याने एक लाख तर निखील दिपक शिंदे पन्नास हजार व पार्वती शंकरराव गायके यांनी पन्नास हजार असे दोन लाखाचे धनादेश गुरुवर्य भास्करगिरी महाराजांकडे सुपूर्त केला