भगवंताच्या नामस्मरणाने जीवनातील संकटाला दूर करा

सुनिल गर्जे
Wednesday, 30 September 2020

मनुष्य जीवनात येणारे बरे वाईट प्रसंग हे परमात्म्याच्या कृपेने व इच्छेने येत असतात. त्यास डगमगून न जाता भगवंताच्या नामस्मरणाने जीवनात आलेल्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री दत्तात्रेय संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

नेवासे (अहमदनगर) : मनुष्य जीवनात येणारे बरे वाईट प्रसंग हे परमात्म्याच्या कृपेने व इच्छेने येत असतात. त्यास डगमगून न जाता भगवंताच्या नामस्मरणाने जीवनात आलेल्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री दत्तात्रेय संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील अधिकमास हरीनाम सप्ताह साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला. या सप्ताहाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या किर्तनाने झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

भास्करगिरी महाराज म्हणाले, "अधिकमासाला मल्लमास व पुरुषोत्तम मास ही म्हटले जाते हा महिना भगवंताचे नामस्मरण व चिंतन करण्याचा पवित्र असा महिना आहे. कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता धैर्याने त्याचा सामना करा.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त पांडुरंग अभंग, युवा नेते उदयन गडाख, बाळासाहेब मुरकुटे, गायक राम विधाते, बजरंग विधाते, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, काशीनाथ नवले, मुळा'चे संचालक बाळासाहेब पाटील, बाळू महाराज कानडे, सरपंच अजय साबळे उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरूमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harinam Saptaha at Devgad in Nevasa taluka