प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हासे, सदिच्छावर राऊत, महिला आघाडी गिरमेंकडे

वसंत सानप
Monday, 7 September 2020

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीत वरील पदाधिकारी निवडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे अध्यक्षस्थानी होते.

जामखेड : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी माधव हासे, सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षपदी नारायण राऊत, तर सदिच्छा महिला जिल्हा आघाडी अध्यक्षपदी मीना गिरमे-जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. 

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीत वरील पदाधिकारी निवडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे अध्यक्षस्थानी होते.

नाशिक विभागीय अध्यक्ष द. कृ. राळेभात, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मोहन शिंदे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पिंपळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे बैठकीला उपस्थित होते. या वेळी जिल्हा शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ, उच्चाधिकार समिती, महिला आघाडी, नगरपालिका संघ, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर संघ आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. 

हेही वाचा - तुम्ही कधी निळा भात खाल्लाय, हे आहेत फायदे

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ः राज्य प्रतिनिधी- गोकुळ कळमकर, भाऊसाहेब जावळे, भारत कोठुळे, नवनाथ अकोलकर, सुभाष खेमनर, सुरेश खेडकर, सुनील गिरमे, बाळासाहेब फटांगडे, संजय पवार. जिल्हा संपर्कप्रमुख- ज्ञानेश्वर माळवे, उत्तर जिल्हाप्रमुख- चंद्रकांत मोरे, दक्षिण जिल्हाप्रमुख- भास्करराव कराळे. 

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ः अध्यक्ष- माधव हासे, कार्याध्यक्ष- राजाभाऊ बेहळे, दादा वाघ, सरचिटणीस- बबन गाडेकर, कार्यालयीन चिटणीस- रावसाहेब हराळ, कोषाध्यक्ष- सय्यदअली जमाल, बाळकृष्ण कंठाळी, प्रसिद्धिप्रमुख- संदीप पोखरकर, ऑडिटर- नवनाथ दिवटे, सहसचिव- सुधीर पाराजी शेळके, राजू अत्तार, संघटक- हरिश्‍चंद्र बडे, अशोक कराड, कृष्णा आनंदा भांगरे, महेश धामणे, 
राजकुमार चोभे, उपाध्यक्ष- पोपट सूर्यवंशी, किरण काळे, बाबा पठाण, रवींद्र घनवट. 

सदिच्छा मंडळ : अध्यक्ष- नारायण राऊत, कार्याध्यक्ष- भाऊसाहेब तोरमल, बाबा आव्हाड, सरचिटणीस- बाळासाहेब डमाळ, कार्यालयीन चिटणीस- शैलेश खणकर, कोषाध्यक्ष- रामदास दहिफळे, भागवत खेडकर, ऑडिटर- बबन ढाकणे, सहचिटणीस- नारायण देवेकर, उद्धव दौंड. संघटक- काशिनाथ लोखंडे, अमोल भंडारी, कारभारी नाचण, राजेंद्र खर्डे, अंकुश झंजाड, उपाध्यक्ष- संजय काळे, भाऊसाहेब राऊत, तुषार केदार, प्रकाश आंबरे, गौतम साळवे. 

सदिच्छा महिला जिल्हा आघाडी ः अध्यक्ष- मीना गिरमे-जाधव, कार्याध्यक्ष- मनोरमा पाटोळे, अंजूम गफार शेख, सरचिटणीस- अर्चना भोसले, कोषाध्यक्ष- सुनीता थोरात. 
या वेळी उच्चाधिकार समिती संघ व सदिच्छा मंडळ (नगर), पदवीधर शिक्षक संघ, नगरपालिका कार्यकारिणी, सदिच्छा मंडळ (नगर) या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hase as president of the Primary Teachers Association