आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये पोपट रावांची चलती, सर्व जागांवर मिळवला विजय

In Hivrebazar, Popatrao Pawar's panel has won all his seven seats
In Hivrebazar, Popatrao Pawar's panel has won all his seven seats

अहमदनगर : देशामध्ये दिशादर्शक असणारे 'आदर्श गाव हिवरेबाजार'  येथे तब्बल ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. याच  या हिवरेबाजार ग्रामपंचायतीच्या निकालाच्या आकडेवारीनुसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय मिळवला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीमध्ये पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आलेली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने त्यांच्या सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले आहे.

मतदारांनी सकाळपासूनच मतदानाच्या दिवशी रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते. गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले आहे. ग्रामस्थांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. अन्य निवडणुका सोडल्या, तर 'ईव्हीएम' आल्यानंतर झालेली ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे  १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली आहे. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेलेले नाही. परंतु यावर्षी प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारचा बिनविरोध निवडणुक फक्त गावातीलच नव्हे, तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवडणुकीत पाळला जात होता. गावकरी एकोप्याने गावातील निवडणूक लढत होते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागले नाही किंवा पोलिंग एजन्ट नव्हते. देशातील हे एक वेगळं उदाहरण असून गावकऱ्यांना प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. 

राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज समजणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा राहणार आहे. या निवडणुकीसाठी सुरवातीच्या अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com