विनापरवाना कोरोना चाचणी केल्याने दोन हॉस्पिटल सील

संगमनेर तालुका प्रशसानाने केली कारवाई
कोरोना टेस्ट.
कोरोना टेस्ट.ई सकाळ

संगमनेर ः तालुक्‍यातील साकूर येथील दोन हॉस्पिटलमध्ये परवानगीविना कोरोनाची चाचणी व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची बाब आज उघड झाली. संबंधित रुग्णालये "सील' करण्यात आली असून, कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Hospital sealing by unlicensed corona testing)

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे साकूर येथे गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना गावातील दोन रुग्णालयांत कोविड रुग्णांवर विनापरवाना उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

या बाबत खात्री करताना डॉ. अविनाश रासने यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी गेले असता, तेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबाबत कुठलीही परवानगी या रुग्णालयाकडे नव्हती.

साकूर येथीलच डॉ. संजय टेकुडे यांच्या ओम साई रुग्णालयात, कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येणारी 17 रॅपिड अँटिजेन किट व कोरोनासंबंधी औषधसाठा आढळून आला. त्यामुळे ही दोन्ही रुग्णालये "सील' करण्यात आली. याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाईबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र वैरागर व डॉ. सारिका धुळगंड यांना सूचना देण्यात आल्या.(Hospital sealing by unlicensed corona testing)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com