esakal | कोविड सेंटरमधील रूग्णांना पुरणपोळीचे जेवण

बोलून बातमी शोधा

Puranpoli meal to patients at covid Center

कोविड सेंटरमधील रूग्णांना पुरणपोळीचा घास

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवसाची गुढीपाडव्याची सुरुवात गोड व्हावी या हेतूने औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते रुग्णांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. सेंटरमध्ये तुटवडा भासत असलेल्या ऑक्‍सिजन सिलेंडर व ऑक्‍सिकॉन्सट्रेटर व 300 रुग्णांना पुरेल असा गोळ्यांचा पुरवठा संजीवनी उद्योग सामूहाच्या वतीने तात्काळ करण्यात आला.

कोल्हे यावेळी म्हणाले,भाजप प्रदेश सचिव व तालुक्‍याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सर्वत्र नूतन वर्षाचे स्वागत व गुढीपाडवा साजरा होत असताना कोविड सेंटरमधील रुग्ण यापासून वंचित राहू नये अश्‍या सूचना दिल्या. त्यानुसार कोविड सेंटरला भेट देत गोड जेवणाचे वाटप करून रुग्णांसोबत आनन्द द्विगुणित केला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, विजय वाजे, कैलास जाधव आदी उपस्थित होते. कोल्हे यांनी कोविड सेंटर येथील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यासंमवेत चर्चा केली असता ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे एक रुग दगवल्याचे निदर्शनास आल्याने संजीवनी उद्योग सामूहाच्या वतीने रुग्णालयाला तत्काळ एक ऑक्‍सिजन सिलेंडर व एक ऑक्‍सिकॉन्सट्रेटर व 300 रुग्णांना पुरेल असा गोळ्यांचा पुरवठा करण्यात आल्याचे कोल्हे यांनी सांगितले . ते पुढे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे आहे अश्‍या वेळी सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.