मी आउटडेटेड नेत्यांबद्दल बोलत नसतो, आमदार लंकेंचा कोणत्या विरोधकावर निशाणा

अनिल चौधरी
Sunday, 27 September 2020

नीलेश लंके म्हणाले, जगात, देशात कोरोना महामारीचा हा हाकार चालू आहे. गावागावांमध्ये अनेक विकास कामांची मागणी ग्रामस्थ करीत आहे. तालुक्यातील साकळाई योजना, केके रेंज, राळेगण सिद्धी पाणी योजना अशा अनेक योजनांच्या अनेक वेळा घोषणा होवून सुद्धा त्या हवेत विरल्या.

निघोज : माझ्या दृष्टीने पारनेर-नगर मतदार संघात विकासकामे महत्वांची आहेत. तालुक्यातील अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यांत अर्थ नाही, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना लगावला आहे. परंतु नेमक्या कोणत्या विरोधकाला त्यांनी हा टोमणा मारला, याची चर्चा सुरू आहे.

कोहकडी (ता. पारनेर) येथे ग्रामपंचायतच्या सुमारे ४८ लाख रुपायांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती सुदाम पवार हे होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. संजय लाकुडझोडे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके,चंद्रकांत लंके, अॅड.राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अरुण पवार, कोहकडीचे सरपंच डॉ. साहेबराव पानगे, जवळ्यांचे उपसरपंच किसनराव रासकर, मार्केट कमिटीचे सदस्य आण्णा पाटील बढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे, सोमनाथ वरखडे, सचिन वराळ, विक्रम कळमकर, अरुण कळमकर, बाळासाहेब खोसे, सुवर्णा धाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ.नीलेश लंके म्हणाले, जगात, देशात कोरोना महामारीचा हा हाकार चालू आहे. गावागावांमध्ये अनेक विकास कामांची मागणी ग्रामस्थ करीत आहे. तालुक्यातील साकळाई योजना, केके रेंज, राळेगण सिद्धी पाणी योजना अशा अनेक योजनांच्या अनेक वेळा घोषणा होवून सुद्धा त्या हवेत विरल्या. मात्र, मी विधानसभा सदस्य झाल्याबरोबरच अनेक योजनांचा पाठपुरावा करून त्या कार्यान्वित होण्यांसाठी प्रयत्न चालू केले.

तालुक्यातील ज्या भागामध्ये विकास कामांची गंगा पोहचलीच नाही, अशा अनेक कामांबरोबरच उर्वरीत ही कामांचा अभ्यास पूर्ण असा मास्टर प्लॅन करून अनेक कोटी रुपायांचा विकास आराखडा तयार केला.

कोरोना महामारीने मात्र निधी मिळण्यांस थोडा विलंब लागला. मात्र, थोड्याच दिवसात तालुक्यातील सर्वच विकास कामे लवकरच चालू झालेली दिसलील. तालुक्यातील सर्व खेड्यापाडयांत वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाबरोबर दर्जेदार रस्त्यांची कामे करणांर असल्यांचे आमदार लंके यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I’m not talking about outdated leaders