थोरातांमुळे आमदार झालो, कानडेंनी सांगितले राजकीय गुपित

MLA Kanade
MLA Kanade

श्रीरामपूर ः सर्वांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळेच भेदभाव न करता गरजेनुसार विकास कामे मंजूर होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या आशीर्वादाने आपण लोकप्रतिनिधी झालो. म्हणून सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील आहोत, असे सांगत आमदार लहू कानडे यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला. कानडे हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेत कार्यरत होते. आपण पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचे असल्याचे ते सांगतात.

शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे. आपणदेखील भुमिपूत्र आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्‍न सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे. तालुक्यात मंजूर झालेली विकासकामे आता दर्जेदार व टिकाऊ होण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे. सर्वांच्या सहभागाने तालुक्याचा विकास करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.("I became an MLA because of Thorat," says Kanade)

MLA Kanade
नाना पाटेकर धावले रोहित पवारांच्या मदतीला

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर व भैरवनाथ मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आज आमदार कानडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सरचिटणीस अंकुश कानडे, पंचायत समिती सदस्य डॉ. वंदना मुरकुटे, उपाध्यक्ष कार्लस साठे, सचिव ऍड. समीन बागवान, विष्णुपंत खंडागळे, विलास शेजुळ, सोमनाथ पाबले, सतीश बोर्डे, सुरेश पवार उपस्थित होते.

यानिमित्ताने भैरवनाथ मंदिर विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने आमदार कानडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. परिसरातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

आमदार कानडे म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद आहे. ग्रामीण भागात अॉनलाईन शिक्षण प्रणाली रुजविण्यासाठी आमदार निधीतून जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सर्व शाळांना एलएफडी टिव्ही उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीबांच्या मुलांच्या डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळेल.

शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेच्या प्रश्‍नांसाठी ४२० के. व्ही.चे उच्च दाबाचे वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून पाटपाण्याच्या नियोजनाचा अनुभव आल्याने आता शेतीच्या पाण्याची जबरदारी आपण स्वतः घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.("I became an MLA because of Thorat," says Kanade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com