तक्रारदार आल्यास गुन्हे तत्काळ दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

पोलिस ठाण्यात कोणी तक्रार देण्यासाठी आल्यास गुन्हे तत्काळ दाखल करून कायदेशीर कारवाई करा.

अहमदनगर : पोलिस ठाण्यात कोणी तक्रार देण्यासाठी आल्यास गुन्हे तत्काळ दाखल करून कायदेशीर कारवाई करा, अशी सूचना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

बहुतांश पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारीनंतर उशिरा गुन्हे दाखल करण्यात होते. त्यात अपघाताचे गुन्हे, साहित्याविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश होता, ही बाब पोलिस अधीक्षक पाटील यांच्या निदर्शनास आली.

त्यामुळे वाजवी कारणाशिवाय गुन्हे उशिरा दाखल होणार नाहीत, अशा सक्त सूचना देण्यात आल्यानंतरही, ऑक्‍टोबर 2020अखेर जिल्ह्यात एकूण 245 गुन्हे उशिराने दाखल करण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबरअखेर ते 112ने कमी झाले आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होण्याबाबत काही अडचणी असल्यास उपविभागीय अधिकारी व अपर पोलिस अधीक्षकांना समक्ष भेटावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If a complainant arrives file a case immediately