अतिवृष्टीतही अकोल्याच्या शेतकऱ्याने नव्या तंत्राद्वारे कमावले लाखो

If you do a new experiment in agriculture, you will get an income of five lakhs
If you do a new experiment in agriculture, you will get an income of five lakhs

अकोले : तालुक्‍यातील शेतकरी परिस्थितीवर मात करून नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच येथील शेतकरी छोट्या भूखंडावर आपला जीवन चरितार्थ चालवण्यासाठी समर्थ आहे. परंतु त्याचे कारणही तसेच आहे. नवनवीन संकल्पना आणि विचार येथील शेतकरी लवकर अवगत करतो व परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या शेतातील उत्पन्न कायम राखण्यात यश मिळवतो.

म्हणतात ना कष्ट करणाऱ्याच्या मागे यश आपोआप धावते. या उक्तीप्रमाणे तालुक्‍यातील आदर्श मानले जाणारे सोमनाथ नवले हे आपल्या पाच एकर क्षेत्रामध्ये दोघांचे कुटुंब लीलया सांभाळतात. त्याचे कारणही तसेच आहे. नवीन संकल्पना आणि विचार शेतीमध्ये उतरवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

नुकताच त्यांनी मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करून दीड एकर क्षेत्रावर झेंडू आणि वांगीचा एकत्र प्लॉट बनवून यशस्वी करून दाखवला. उन्हाळी हंगामात या क्षेत्रावर मल्चिंग पेपरच्या आधारे टोमॅटोचे पीक त्यांनी घेतले. त्याच क्षेत्रात टोमॅटोचे पीक काढून झाल्यानंतर झेंडू प्राईम ऑरेंज वाण आणि वांगी अंकुर अजय वाण त्यांनी एकाआड एक या पद्धतीने लागवड केली.

सध्या त्यांचे झेंडूचे उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे. दसरा हा देशातील सर्वात मोठा सण मानला जातो. पावसाळी हंगाम संपल्यानंतर दसरा या सणाने देशात उत्सव आणि सणांना सुरुवात होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या झेंडूचे पाच तोडे आतापर्यंत केलेले आहेत. त्यापासून त्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच दिवाळीपर्यंत या फुलांची तोडणी सुरू राहणार आहे. त्यापासून अंदाजे एक लाख खर्च वजा जाता येणे अपेक्षित आहे.

वांगे पिकाचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. त्यापासून सरासरी साडेतीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. म्हणजेच या दोन्ही पिकातून खर्च वजा जाता चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना नावीन्यपूर्ण शेतीने परिस्थितीवर मात करून इतर शेतकऱ्यांना त्यांनी नवा आदर्श घडविला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com