बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर छापे

संगमेनर परिसरातील कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
biodiesel pump
biodiesel pumpsakal

संगमनेर : शहरातील मालदाड रोड व कोल्हेवाडी रोड परिसरात बेकायदा बायोडिझेल विक्री करणाऱ्या दोन ठिकाणांवर कारवाई करून शहर पोलिसांनी बायोडिझेलसह विविध प्रकारची वाहने, असा सुमारे 19 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १९) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून मालदाड रोड परिसरातील दत्तनगर येथील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या बेकायदा बायोडिझेल विक्रीच्या ठिकाणावर छापा घातला. तेथे विविध प्रकारची वाहने संशयास्पदरीत्या उभी असलेली आढळली. या ठिकाणी एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बायोडिझेल अनधिकृतरीत्या भरताना आढळून आले.

या छाप्यात एमएच. 40 डी. एस. 7440, एमएच. 17 बी वाय. 5245 अशी दोन चारचाकी वाहने, दोन टाक्या व फिल्टर मशिन, 365 लिटर बायोडिझेल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच राहुल रमेश सस्कर (वय 27) पावबाकी रोड, संगमनेर, मोहंमद यामिन वाहिद हुसेन ( 23) रा. जसपूर, पतरामपूर रोड, जि. उधमसी ( उत्तराखंड ), संदीप मारुती पावसे ( 36 ), सुनील मारुती पावसे ( 31 ) व गोकुळ अण्णासाहेब जाधव ( 30 ) तिघेही रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर व गणेश दादासाहेब सोनवणे (वय 24, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दुसऱ्या घटनेत दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या बायोडिझेल विक्री सुरु असल्याचे समजल्याने पोलिस पथकाने छापा टाकला. तेथे 15 हजार 600 रुपये किमतीचे 195 लिटर बायोडिझेलचे 6 कॅन, इलेक्ट्रीक मोटार, पाइप, द्रव पदार्थ मापक साधने असा 19 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल आढळला. विक्री क्रेंद्र चालक संजय पगडाल (रा. उपासनी गल्ली, संगमनेर) फरार झाला आहे. या सर्वांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com