जामखेडमध्ये भरोसा सेल, सुनंदा पवार यांच्या हस्ते उदघाटन

वसंत सानप
Thursday, 28 January 2021

जामखेड पोलिस स्टेशन येथे आमदार रोहित पवार यांच्या मातु:श्री व एकात्मिक विकास संस्थेच्या अध्यक्ष सुनंदा पवार यांच्या हस्ते पोलिस ठाण्यासाठी आलेल्या वाहनांचा व एका रुग्णवाहिकेचा हस्तांतर सोहळा झाला.

जामखेड : ""मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांचे धाडस वाढविण्यासाठी जामखेड, कर्जत व श्रीगोंदे या तीन तालुक्‍यांत "भरोसा सेल'ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे मुली- महिलांचे प्रश्न सुटतील,'' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पवार यांनी केले. 

जामखेड पोलिस स्टेशन येथे आमदार रोहित पवार यांच्या मातु:श्री व एकात्मिक विकास संस्थेच्या अध्यक्ष सुनंदा पवार यांच्या हस्ते पोलिस ठाण्यासाठी आलेल्या वाहनांचा व एका रुग्णवाहिकेचा हस्तांतर सोहळा झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, आमदार पवार यांच्या सौभाग्यवती कुंती पवार, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी बेलेकर, सभापती राजश्री मोरे, मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, संजय कोठारी, ऍड. हर्शल डोके, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, ऍड. प्रमोद राऊत उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration by Bharosa Cell in Jamkhed