Video : मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराएेवजी अरेरावी

Inconvenience at Mirajgaon Health Center
Inconvenience at Mirajgaon Health Center

कर्जत: मिरजगाव केंद्रात रूग्णांची हेळसांड केली जाते. त्यांच्यासोबत बोलताना अरेरावीची भाषा केली जाते. त्यांना सेवा देण्याएेवजी तिष्ठत ठेवतात. या विषयी परिसरात संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग चांगले काम करीत आहे मात्र, ग्रामीण भागात सेवा देताना हलगर्जी पणा केल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

आज आमदार पवार यांनी तालुक्यातील मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देत झाडाझडती घेतली. या वेळी काही रुग्णांनी तेथील नियुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत रुग्णाची हेळसांड करणे, तिष्ठत बसायला लावणे, अरेरावी करणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या.

या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ. चंद्रकांत कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, शहराध्यक्ष तान्हाजी पिसे, युवकचे उपतालुकाध्यक्ष गणेश नलवडे, राम रंधवे,वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र शेकडे आणि डॉ. हरीश दराडे या वेळी उपस्थित होते.

आ.पवार म्हणाले येथे अनेक तक्रारी आहेत काम चांगले करणारांचे कौतुक करू मात्र कोरोना आपत्तीत कुणी रुग्णांची अडवणूक करीत असेल त्यांचे काय करायचे ते बघू.पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. 

तनपुरे म्हणाले, आपल्या कानावर काही तक्रारी आल्या होत्या. त्याची वेळीच दखल घेत आपण संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्या होत्या.

या बाबत मी स्वतः जातीने लक्ष घालीत मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत चौकशी करणार आहे.यात दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

-डॉ. संदीप पुंड,

तालुका वैद्यकीय अधिकारी,कर्जत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com