इंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द

पत्रक काढून इंदुरीकर यांनी ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
Indurikar
IndurikarTeam eSakal

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची तब्येत अचानक बिघडल्यानं येत्या आठवड्याभरातील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. एक पत्रक काढून इंदुरीकर यांनी स्वतः याची माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Indurikar Maharaj health deteriorated All events canceled)

Indurikar
शरद पवारांचा मी आदर करतो यापुढेही करत राहीन - बृजभूषण सिंह

अचानक तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं २३ मे पासून ३० मे पर्यंतचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सर्व रद्द करण्यात येत आहेत. यामुळं कार्यक्रमाच्या आयोजकांची गैरसोय होणार आहे. यासाठी मी दिलगीर आहे. उपचारांनंतर तब्येत पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, तोपर्यंत सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी असोत असं इंदुरीकर यांनी पत्रकात म्हटलं आहे.

"रावणाने जेवढे अत्याचार केले नाहीत, तेवढे राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी केले"

इंदुरीकर यांच्या कारला नुकताच जालन्यातील परतूर इथं मोठा अपघात झाला होता, यातून ते बचावले होते. इंदुरीकर यांच्या स्कॉर्पिओ कारनं ट्रॅक्टरला धडक दिली होती. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत त्यांना मदत केली होती. यामध्ये इंदुरीकर यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com