video : भंडारदरा धरणावर बॉम्बशोधक पथक... काय झालं होतं असं..?

Inspection of Bhandardara Dam by Anti Terrorist Squad
Inspection of Bhandardara Dam by Anti Terrorist Squad

अकोले : भंडारदरा धरण व तेथील विद्युत निर्मिती केंद्राची नाशिक व शिर्डी येथील संयुक्त बॉम्बशोधक पथकाने, तसेच दहशतवाद विरोधी पथकाने कसून तपासणी केली. धरणाचा कानाकोपरा धुंडाळण्यात आला. भंडारदरा धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही तपासणी करण्यात आली. तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत तेथील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पथकाने दिल्या.

शिर्डी येथील बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख राजेश घोळवे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक व शिर्डी येथील पथक गुरुवारी (ता.2) सायंकाळी भंडारदरा धरणावर हजर झाले. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकही तेथे दाखल झाले. 

पोलिस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या सहकार्याने भंडारदरा धरण व विद्युत निर्मिती केंद्र एक यांची तब्बल चार ते पाच तास तपासणी सुरू होती. धरणाचा कानाकोपरा पथकाने धुंडाळून काढला. या वेळी पथकाला काहीही आक्षेपार्ह आढळले नसले, तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धरणावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पथकाने दिल्या. 

दर तीन महिन्यांनी होते तपासणी 

दहशतवादविरोधी पथक दर तीन महिन्यांनी भंडारदरा धरणाची तपासणी करीत असते. तसेच बॉम्बशोधक पथकही दर सहा महिन्यांनी अशी नियमित तपासणी करण्यासाठी येत असते. मात्र, यावेळी या दोन्ही पथकांनी एकत्रितच धरण परिसर व विद्युत निर्मिती प्रकल्पाची तपासणी केल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख व सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. 

अतिरेकी संघटनांचा धोका 

भंडारदरा धरण ब्रिटिशकालीन असून, धरणाची लवकरच शतकपूर्ती होणार आहे. त्यामुळे अतिरेकी संघटनांकडून घातपाताची शक्‍यता नाकारता येत नाही. खबरदारीची उपाययोजना म्हणून, ही नियमित तपासणी केली जात असल्याचे राजेश घोळवे यांनी सांगितले. तपासणीच्या वेळी बॉम्ब डिटेक्‍टर, तसेच श्‍वानपथकाचीही मदत घेण्यात आली. तब्बल चार ते पाच तास संपूर्ण धरण परिसर व वीजनिर्मिती प्रकल्पाची तपासणी सुरू होती. 

भंडारदरात 2800 दशलक्ष घनफूट पाणी

दरम्यान, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अजून दमदार पावसाला सुरवात झालेली नाही. पावसाच्या सरी अधुन-मधून कोसळत आहेत. मात्र, तरीही धरणात यंदा बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. सध्या भंडारदरा धरणात 2800 दशलक्ष घनफूट, तर निळवंडे धरणात 4 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वीच धरण भरण्याचा इतिहास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com