पोलिस निरीक्षक बहिरट यांच्याकडील तपास काढला; गुटखा प्रकरणाचा तपास आता सातव यांच्याकडे

गौरव साळुंके
Sunday, 18 October 2020

गुटखा प्रकरणाचा तपास अखेर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडून काढून घेतला आहे. सदर तपास शिर्डी येथील पोलिस उपाधिक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी सांगितली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील गुटखा प्रकरणाचा तपास अखेर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडून काढून घेतला आहे. सदर तपास शिर्डी येथील पोलिस उपाधिक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी सांगितली. 
तालुक्यातील एकालहरे शिवारातील आठवडी परिसरात पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी छापा टाकून एका गोदामात लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. गुटख्याची साठेबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. तर फरार आरोपींचा शोध सुरु आहे. 

एकलहरे येथील अवैद्य गुटखा प्रकरणाची कारवाई वादग्रस्त ठरली. असुन यासंदर्भात समाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पोलिसांची चौकशी करण्याची तक्रारी केली आहे. सदर तक्रारींची गंभीर दखल घेत अखेर येथील अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार अखेर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडुन गुटखा प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक बहिरट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारानुसार पोलिस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तालुक्यातील एकलहरे येथे छापा टाकुण 46 लाखांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी निमगाव जाळी (ता. संगमनेर) आणि नगर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकुन लाखों रुपयांचा अवैद्य गुटखासह सुगंधी तंबाखू जप्त केल्यामुळे गुटखा प्रकरण चर्चेत राहिले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An investigation was launched by police inspector Bhairat