प्रवरा सहकारी बँकेला आयएसओ मानांकन

ISO accreditation to Pravara Sahakari Bank
ISO accreditation to Pravara Sahakari Bank

कोल्हार ः प्रवरा सहकारी बॅंकेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. बॅंकेने एक हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर व उपाध्यक्ष अशोक आसावा यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

भवर म्हणाले, बॅंकेचे सभासद, कर्जदार, ठेवीदारांना योग्य सेवा दिली. गुणात्मक धोरणांची अंमलबजावणी केली. त्यासाठी बॅंकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सेवा पुरवठादार व ग्राहकांशी विचारविनिमय करून बॅंकेची धोरणे ठरवली व ती राबविली. 
सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात थकीत शेती कर्जाच्या वसुलीस शासनाने स्थगिती दिल्यामुळे कृषी कर्जवसुली करण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत बॅंकेचा एनपीए वाढलेला दिसतो. 

अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन बॅंकेने ग्राहकांना आधुनिक सुविधा पुरविल्या. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा बॅंक ठेवी कर्जवितरण आणि नफ्यात वाढ करू शकली आहे. यावेळी बॅंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौरभ बालोटे, विशेष सल्लागार एन. एस. डोईफोडे, 

मुख्य व्यवस्थापक डी. जी. उदावंत, वसुली विभाग प्रमुख डॉ. सुशांत वाडिले, व्यवस्थापक ए. एन. माघाडे, 
व्यवस्थापक एस. के. शेजवळ, व्यवस्थापक ए. पी. घोलप आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com