
पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर थंडीचा कडाका वाढल्याने रानवस्तीसह गावात व चौकाचौकात शेकोट्या पेटल्या आहेत.
सोनई (अहमदनगर) : जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर थंडीचा कडाका वाढल्याने रानवस्तीसह गावात व चौकाचौकात शेकोट्या पेटल्या आहेत.
गेल्या महिन्यात तीन- चार दिवस थंडी मोठ्या प्रमाणात होती. मात्र त्यानंतर अभाळ निघू लागल्याने थंडी गायब झाली होती. यंदा भरपुर पाऊस झाल्याने गहू, हरभरा व भाजीपाला पीक जोमात आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात तुरळक पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या तूरीचे काही प्रमाणात नुकसान झाले होते.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोनईसह शनिशिंगणापुर, शिरेगाव, घोडेगाव, चांदे व परीसरात सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. या दिवसापासून आकाश निरभ्र होवून थंडीचा कडाका व थंड हवा वाढल्याने सर्वत्र शेकोट्या पेटल्या आहेत.
थंडी आणि बिबट्या...
अंधारतोंडी पहाटेच ऊस तोडणीला जाणारे ऊस तोडणी कामगार आता थंडी आणि बिबट्याच्या भितीने चांगलेच गारठले असुन यावर्षी प्रथमच दिवस उजडल्यानंतर कोयता हातात घेतला जात आहे.
संपादन : अशोक मुरुमकर