कर्जतमध्ये पुन्हा कोरोना... जळगाव, पाटेगाव झाले कंटेन्मेंट झोन

Jalgaon, Pategaon became containment zone
Jalgaon, Pategaon became containment zone

कर्जत : तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव थांबला आहे असे वाटत असतानाच आज अचानक पुन्हा दोन रुग्ण आढळले. यातील एकजण जळगाव येथील तर दुसरा पाटेगाव येथील आहे.या दोघांच्या संपर्कात कोण कोण आलेले आहेत याची चाचपणी चालू अाहे. 

पहिल्या टप्प्यात दोघांच्या संपर्कात आलेल्या एकूण बेचाळीस जणांचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले अाहे. त्यात दोन डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली आहे.

या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात काही डॉक्टर मंडळीसुद्धा आली असल्याने परिसरात अजून धाकधूक वाढली आहे.या दोन्ही गावात भेट दिल्यानंतर पुढील चौदा दिवस माहिजळगाव आणि पाटेगाव कंटेन्मेंट झोन राहील असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्पष्ट केले. 

या वेळी सरपंच भैरवनाथ शेटे, उपसरपंच दीपक जाधव, जेष्ठ शंकरराव जाधव, अनिल पवार, ग्रामसेवक प्रवीण जगधने, तलाठी राहुल बुक्तरे, तलाठी नीलेश साळुंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ही दोन्ही गावे नगर सोलापूर महामार्गाच्या लगत अाहेत. हायवेवरील या शेजारीशेजारच्या गावांमध्ये हे दोन रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यातील कोरोना तपासणीसाठी चौघांचे स्राव दोन दिवसांपूर्वी घेण्यात आले होते. तो रिपोर्ट आज प्राप्त झाला. त्या मध्ये मिरजगाव व जळगावमधील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच हायसे वाटले. मात्र, नंतर पाटेगाव व जळगावमधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले.

या दोघांपैकी पुणे जिल्ह्यातील एका गावातून तर दुसरा मुंबई येथे जाऊन आला असल्याची चर्चा दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये आहे.

यातील एक महावितरणचा खासगी कर्मचारी अाहे. त्यामुळे येथील महावितरण शाखा व कामानिमित्त संपर्कात आलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकला अाहे. सर्वांचे संपर्कात आलेल्यांच्या रिपोर्टकडे डोळे लागले आहेत.


आजपासून पाटेगाव व जळगाव चौफुला ही दोन्ही गावे कॅन्टोमेंट झोनमध्ये अाहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. या कालावधीत नियमांचा भंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

- नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com