Jamkhed : नोंदीसाठी तलाठीच येणार दारी

रोहित पवारांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडमध्ये महाफेरफार अदालत
 farmers
farmers sakal

जामखेड : वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे चकरा माराव्या लागतात. मात्र, कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांची त्यापासून सुटका होणार आहे. दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महसूलच लोकांच्या दारी जाणार आहे. सर्व मंडळ स्तरावर ‘महाफेरफार अदालती’चे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाची सुरवातही झाली आहे.

रोहित पवार हे आमदार झाल्यापासून मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. गेले चार दिवस त्यांनी ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेतल्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा दस्त झाल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर लावण्यात येणाऱ्या नोंदींसह इतरही वेगवेगळ्या नोंदी लावण्यासाठी अनेकदा नागरिकांना तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतात.

चकरांच्या या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ‘महाफेरफार अदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. मतदारसंघातील सर्व मंडळ स्तरावर ही ‘महाफेरफार अदालत’ होणार आहे. या ठिकाणी सर्वांनाच बोलावून, एक महिन्यापेक्षा जास्त दिवस नोंदीसाठी प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी महाफेरफार अदालतीच्या दिवशी मंडळ कार्यालयात दिवसभर स्वतः उपस्थित राहून कामकाजाची पाहणी करतील व तहसीलदारांना अहवाल सादर करतील.

"अधिकारी आणि नागरिकांतील अंतर जेवढे कमी होईल, तेवढा नागरिकांना त्याचा फायदा होत असतो. मतदारसंघातील सर्वच अधिकारी चांगले काम करीत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी थोरबोले आणि कर्जत व जामखेड येथील तहसीलदार या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे."

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com