कर्जत : बेनवडीत सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

घराच्या छतातून उतरला वीजप्रवाह
electric shock
electric shocksakal

राशीन : पत्र्याच्या शेडला अडकवलेली दुधाची बादली काढताना बेनवडी (ता. कर्जत) येथील दोन सख्ख्या भावांचा, विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. 28) सकाळी सहाच्या सुमारास घडली. यामध्ये अमोल हनुमंत धुमाळ (वय 30) व सचिन हनुमंत धुमाळ (वय 25) या दोघांचा समावेश आहे.

पत्र्याच्या शेडमध्ये पावसाने विजेचा प्रवाह उतरला होता. शेडला अडकवलेली दुधाची बादली सचिन काढत असताना ही घटना घडली. सचिनला वाचविण्यासाठी गेलेल्या अमोललाही विजेचा धक्का बसला. मुलांना वाचविण्यासाठी त्यांची आई धनश्री गेल्या असता त्यांनाही धक्का बसला. मात्र, प्रसंगावधान दाखवून हनुमंत धुमाळ यांनी विजेचा प्रवाह असलेली वायर हिसका देऊन तोडल्याने धनश्री यांचा जीव वाचला.

धुमाळ कुटुंबाने कालच नवीन घराचा स्लॅब टाकला होता. त्यात पाऊस झाल्याने सर्वत्र ओलावा होता. त्यामुळे विजेचा प्रवाह पत्र्याच्या शेडमध्ये उतरला. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा असा अकाली मृत्यू झाल्याने बेनवडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अमोलचे लग्न झाले असून, त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. सचिन हा पदवीधर होता. ऐन तारुण्यात कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई-वडिलांचे आक्रंदन पाहून अंतःकरण पिळवटून निघत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com