दहा लाखाच्या खंडणीसाठी दुकानाचा मालक व कामगाराचे अपहरण

Kidnapping of shop owner and worker for ransom of Rs 10 lakh
Kidnapping of shop owner and worker for ransom of Rs 10 lakh

कोपरगाव (अहमदनगर) : शहरातील बालगणेश किडस दुकानाचे मालक व एका कामगाराचे अपहरण करून १० लाखाची खंडणी मागणी करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. 


संशयित आरोपीविरुद्ध खंडणीसाठी अपहरण व मृत्यूचे कारण देत भय दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण बबनराव पवार (रा. समतानगर) व अक्रम शफिओद्दिन शेख (रा. दत्तनगर) असे अपहरण करून सुटका झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान पोलिसानी सापळा रचून सचिन राजेंद्र कुसुंदर ( रा.लक्ष्मीनगर) , सचिन संजय साळवे ( रा. गजानननगर ), आकाश विजय डाके (रा. गोकुळनगरी) ,शुभम केशव राखपसारे (रा. कोर्टरोड) या चौघांना शिर्डी येथे ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना 17 जुलैला सायंकाळी साडेचार वाजेनंतर घडली. 

याप्रकरणी बबनराव पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हंटलंय की, यातील संशयित आरोपींनी संगनमत करुन कारमधुन फिर्यादीचा मुलगा श्रीकृष्ण व कामगार अक्रम शेख अशांना 10 लाख रुपयाकरीता पळवुन नेवुन त्यांचे मोबाईल, स्कुटर व मोटर सायकल ताब्यात ठेवुन त्यांना शिर्डी येथे एका हॉटेलवर व कारमध्ये डांबुन ठेवुन मारहाण करुन जिवे मारणेची धमकी दिली.

फिर्यादीचा मुलगा श्रीकृष्ण यास फिर्यादीचा दुसरा मुलगा अनिल पवार याचे मोबाईलवर फोनकरुन अर्जट सचिन सावजी याचे घरी 10 लाख रुपये पोहचकर तु जर पैसे दिले नाही तर सचिन आत्महत्या करील असे बोलण्यास भाग पाडले आहे. दरम्यान सदर घटनेला उसने पैसे घेतल्याचा जुन्या वाद कारणीभूत असल्याचे माहिती पुढे आली आहे.

संपादन अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com