मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत कोरठण खंडोबा यात्रा

Korthan Khandoba Yatra in the presence of few devotees
Korthan Khandoba Yatra in the presence of few devotees

टाकळी ढोकेश्वर : कोरठण खंडोबा देवस्थानच्या याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. अनेक भाविक यात्राकाळात दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परंपरेत खंड पडला.

पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थानाच्या वार्षिक यात्रोत्सवाची आज मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत काठ्यांच्या मिरवणूकीने सांगता झाली. 

बेल्हे (ता. जुन्नर) व ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठ्यांनी कळस व देवदर्शन घेतल्यानंतर तीन दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. पहाटे पाच वाजता खंडोबा चांदीचे सिंहासन व उत्सव मुर्तींना साजशृगार करण्यात आल्यानंतर पुजा व अक्षय येवले या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा झाली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक शंकर राजपूत यांच्या हस्ते खंडोबाची महाआरती, अभिषेक महापुजा झाली.

कोरठण खंडोबा, बेल्हे, सावरगाव घुले, कांदळी, माळवाडी, कळस या मानाच्या पालख्यांनी देवभेट घेण्यासाठी मंदिर प्रदक्षिणा सुरू केली. अध्यक्ष ऍड. पांडुरंग गायकवाड यांनी या पालख्यांचे स्वागत केले. पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक शंकर राजपूत यांनी पालखी मानकऱ्यांचा सन्मान केला.

तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या हस्ते मानाच्या काठ्यांची शासकीय महापुजा झाली. त्यानंतर परंपरेप्रमाणे कार्यक्रमांची सांगता झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com