रिसोर्स बँकेच्या यादीतून नगरच्या कृषीमित्रांना वगळले

सूर्यकांत नेटके
Friday, 11 December 2020

प्रयोगशील, प्रगतिशील शेतकऱ्यांसह कृषिभूषण, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, सेंद्रिय शेती, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

नगर ः संशोधक, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कृषी विभागाने विविध कृषी पुरस्कारांनी गौरविलेल्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली.

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा त्यात समावेश केला. मात्र, नगरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने येथील शेतीमित्रांना रिसोर्स बॅंकेच्या यादीतून वगळले. याबाबत काहीही बोलण्यास कृषी विभाग तयार नाही. 

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून राज्यातील शेती विकासात्मक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचण आली. मात्र, शेतीविकासासाठी राज्यातील प्रगतिशील शेतकरी, विविध प्रयोगांतून शेती करणारे, तसेच कृषी विभागाचा कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली. त्यात आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांची यादी संकलित झाली आहे.

हेही वाचा - केळीसाठी पठ्ठ्याने विकली शेती

प्रयोगशील, प्रगतिशील शेतकऱ्यांसह कृषिभूषण, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, सेंद्रिय शेती, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

मानोरी (ता. राहाता) येथे चार दिवसांपूर्वी कृषिमंत्री भुसे यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला. नगर जिल्ह्यातील 20 वर्षांतील 67 शेतकऱ्यांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविली आहे. मात्र, त्यात कृषी विभागाच्या शेतिमित्र पुरस्कारप्राप्त व्यक्तींना वगळले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

राज्यातील अन्य शेतीमित्रांचा यादीत समावेश असताना, फक्त नगरमधीलच शेतकऱ्यांना वगळले आहे. ही नावे का वगळली, याबाबत कृषी अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे येथील शेतीमित्र पुरस्कारप्राप्त शेतकरी याबाबत कृषिमंत्री, कृषी सचिव, तथा आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishimitra of Ahmednagar was dropped from the list of Resource Bank