क्षितिजकडून वृद्धाश्रमात फराळ, किराणा वाटप करुन दिवाळी साजरा

शांताराम काळे
Monday, 16 November 2020

नवलेवाडीमधील क्षितिज फाउंडेशन अमृतनगर, यांच्या वतीने केळंगुण येथील नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात वृद्धांसाठी फराळ व किराणा मालाचे वाटप करून त्यांची दिवाळी साजरी केली.

अकोले (अहमदनगर) : नवलेवाडीमधील क्षितिज फाउंडेशन अमृतनगर, यांच्या वतीने केळंगुण येथील नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमात वृद्धांसाठी फराळ व किराणा मालाचे वाटप करून त्यांची दिवाळी साजरी केली.

क्षितिज फौंडेशन ही संस्था नुकतीच स्थापन झाली असून सामाजिक जाणिवेतून हा पहिलाच उपक्रम स्तुत्य असल्याची भावना वृद्धाश्रमचे व्यवस्थापक वाकचौरे यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वैरागर यांनी केले.

फराळाबरोबर 3500 रुपयांचा किराणा म्हणून १० किलो साखर, दोन किलो शेंगदाणे, पाच किलो बेसन, २० किलो गहू आटा, १० किलो गोडेतेल व फराळामध्ये बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचुर लाडू, करंजी शेवचिवडा वाटप करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक वकचौरे यांनी किराणा माल स्वीकारून आभार व्यक्त केले.

यावेळी प्रेरणा आर्बन मल्टीपल निधीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जाधव,  सागर पवार, क्षितिज फाउंडेशनच्या सचिव वैशाली वैरागर, संतोष जंगम, वृद्धाश्रमाचे कर्मचारी यांच्यासह ४४ वृद्ध महिला व पुरुष सामाजिक अंतर व मास्कचा वापर करून उपस्थित होते. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kshitij Foundation celebrates Diwali at Vriddhashram in Navlewadi