esakal | आमदार संग्राम जगतापांच्या हस्ते लव- श्रीरामपूर संकल्पनेचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Launch of Love Shrirampur concept at the hands of MLA Sangram Jagtap

कॅनॉल कॉर्नर परिसरातील उद्यानासमोर पालिकेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लव- श्रीरामपूर संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार संग्राम जगतापांच्या हस्ते लव- श्रीरामपूर संकल्पनेचा शुभारंभ

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील कॅनॉल कॉर्नर परिसरातील उद्यानासमोर पालिकेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लव- श्रीरामपूर संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्रीरामपूरकरांच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी आमदार संग्राम जगताप यांना पुष्पगुच्छ देवुन सन्मान केला. 

लव-श्रीरामपूर संकल्पनेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले, येथील नगरपालिकेने नव्याने लव- श्रीरामपूर संकल्पना सुरु केली आहे. यानिमिताने उद्यान आणि चौकाचे सुशोभीकरण केले आहे. लव-श्रीरामपूरच्या माध्यमातुन नागरीकांचे आपल्या शहराबद्दल असलेले प्रेम आणि आत्मियता जागृक होण्यास मदत होणार आहे. प्रत्येकाला आपल्या शहराविषयी आदर आणि प्रेम वाढविण्यासाठी ही संकल्पना मोलाची ठरेल. लव- श्रीरामपूर फक्त वरवरची संकल्पना नसुन हा एक चांगला विचार आहेत.

चांगल्या विचारांच्या माध्यमातुन आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा. तसेच आपले शहर आणि परिसर स्वच्छतेसाठी जनजागृती करावी. लव-श्रीरामपूर संकल्पनेमुळे पुढील काळात शहरात विविध विकास कामांतुन शहराचे नाव लौकीक होईल असे कार्य करावे. उद्योगपती फिरोदिया यांनी दहा वर्षापुर्वी नगर येथे ही संकल्पना मांडली होती. त्यास नागरिक प्रतिसाद मिळाला आणि शहर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली. त्यामुळे श्रीरामपूरातही हे शक्य होणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेद्र भांडवलकर, नगरसेवक प्रकाश भागानगडे, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरिक्षक मसुद खान, नगरसेवक मुखतार शाह, रईस जाहागिरदार, दिपक चव्हाण, अल्तमश पटेल उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक मनोगत व्यक्त करुन मान्यवरांचे आभार मानले. नगरसेवक राजेंद्र पवार यांनी सुत्रसंचलन केले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image