
अहिल्यानगर : कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा- पाण्याविना निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या ४० जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. ही कारवाई नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे आज करण्यात आली. त्यात १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून पाच आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.