आपल्या हाटके स्टाईसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या गावाची माहिती जाणून घ्या

अशोक मुरुमकर
Sunday, 30 August 2020

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे ह. भ. प. निवृत्ती देशमुख महाराज यांच्या कीर्तनाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

अहमदनगर : कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे ह. भ. प. निवृत्ती देशमुख महाराज यांच्या कीर्तनाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या कीर्तनाने तरुणाईच्या मनावर भुरळ घातली आहे. त्याच्या कीर्तनातील डायलॉगवर टिकटॉकवर अनेक व्हर्जन निघाले.

त्यांच्या वक्तृत्वामुळे महाराष्ट्रात काही वर्षांतच त्यांना लोकप्रियता मिळत गेली. पण अनेकांना त्यांच्या गावाची माहिती नाही. डोंगरदऱ्यात लपलेल्या त्यांच्या नावामुळे त्यांच्या गावालाही लोकप्रियता मिळाली. अशी अनेक गावे आहेत, की गावातील व्यक्तींमुळे गावाचे नाव होते, त्यापैकीच एक म्हणजे इंदुरी! 

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात सुमारे 2500 लोकसंख्या असलेले इंदुरी हे देशमुख महाराजांचे गाव आहे. गावाच्या इंदुरी नावामुळेच देशमुख महाराजांचा इंदुरीकर असा अपभ्रंश झाला. निवृत्ती काशिनाथ देशमुख असं त्यांचं पूर्ण नाव आहे. निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने ते राज्यात प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील ते एक विनोदी कीर्तनकार व समाजप्रबोधक आहेत. समाजातील कु-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात. तरुणाईमंधील व्यसनाधीनता, गुन्हेगारी यासह विविध विषयांवरही ते कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी भाष्य करत जानजागृती करतात. त्यांचे मूळगाव इंदुरी आहे; मात्र सध्या ते संगमनेर तालुक्‍यातील ओझर येथे राहतात. 

प्रवरा नदीच्या किनारी असलेल्या इंदुरी गावात भक्त सांप्रदायिक लोक आहेत. अकोलेपासून 10 किलोमीटरवर हे गाव आहे. हागणदारीमुक्त असलेल्या या गावाचा स्वच्छ निर्मल अभियानात सामावेश आहे. इंदुरी, मेहंदुरी व रुंभोडी अशी तीन गावे शेजारी आहेत. इंदुरीला दोन महाराज आहेत. या गावात नवले, देशमुख, आवारी, गायकवाड अशी आडनावे आहेत.

इंदुरीकर महाराजांनी येथील मंदिरासाठी मदत केली होती. इंदुरी गावाचा संपूर्ण भाग बागायती आहे. येथे प्रतिविठ्ठल मंदिर आहे. इंदुरी गावातील एका शेतात देशमुख महाराज राहतात. सध्या ते ओझरमध्ये राहतात. तिथे त्यांनी एक शाळा काढलेली आहे.

छायाचित्रे : शांताराम काळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn about Indurikar Maharaj village which is famous for its Hatke Style