बिबट्याला पाहून तरुणाने विहिरीमध्ये टाकली उडी; हल्ल्यामधून मुलगी वाचली 

राजेंद्र सावंत
Thursday, 10 December 2020

मिडसांगवी येथे वीजपंप सुरू करण्यासाठी शेतात गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला.

पाथर्डी (अहमदनगर) : मिडसांगवी येथे वीजपंप सुरू करण्यासाठी शेतात गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, मुलीच्या अंगावरील मफलर व ओढणी असल्याने, बिबट्याच्या तोंडात कापड गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक धावल्याने बिबट्याने पळ काढला. मुलगी बालंबाल बचावली. तानीया दिलावर शेख, असे तिचे नाव आहे. 

मिडसांगवी येथे विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी बुधवारी सकाळी सात वाजता तानीया शेख शेतात गेली होती. त्यावेळी विहिरीवर बसलेल्या तानीयावर बिबट्याने हल्ला केला. तानीयाच्या अंगावरील मफलर व ओढणी बिबट्याच्या तोंडात गेली. त्याच वेळी शेजारील लोक धावल्याने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात तानीयाच्या हाताला जखमा झाल्या आहेत. तिच्यावर खरवंडी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बिबट्याला पाहून मारली तरुणाने विहिरीमध्ये उडी 

दरम्यान, तांबेवाडी (टाकळीमानुर) येथे आज सकाळी 11 वाजता पिकाला गणेश सुदाम महानवर (वय 16) पाणी देत होता. त्याच वेळी बिबट्या त्याच्याकडे येताना गणेशला दिसला. बिबट्यापासून वाचण्यासाठी गणेशने कोणताही विचार न करता, विहिरीत उडी घेतली. विहिरीतून आरडाओरडा केल्यावर लोक मदतीसाठी धावले. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव टप्पा येथील शंकर धोंडीबा शिरसाट यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, मनीषा ढाकणे यांनी शिरसाट कुटुंबाची भेट घेतली. काल (मंगळवारी) रात्री टाकळीमानूर येथील नूर मोहम्मद शेख यांनी घरासमोर बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे म्हैस बचावली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attack at Midsangvit in Pathardi taluka