
दरवर्षी भल्या पहाटेपासून ऊसतोडणीचे काम झपाटल्या प्रमाणे करणारे ऊसतोडणी कामगार यंदाच्या हंगामात कडाक्याची थंडी व बिबट्याच्या भितीने सावध पवित्रा घेतच काम करत आहेत.
सोनई (अहमदनगर) : दरवर्षी भल्या पहाटेपासून ऊसतोडणीचे काम झपाटल्या प्रमाणे करणारे ऊसतोडणी कामगार यंदाच्या हंगामात कडाक्याची थंडी व बिबट्याच्या भितीने सावध पवित्रा घेतच काम करत आहेत.
पावसाची मोठी कृपा झाल्याने यंदाच्या वर्षी सर्वच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. अधिक ऊसामुळे यंदाचा गळीत हंगाम एप्रिल- मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात कारखाना प्रशासनाने सर्व ऊसतोडणी कामगारांना एकाच परीसरात न राहता अंतर ठेवून राहण्याची सुचना केली आहे.
नेवासे तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात रोज कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे.मागील महिन्यात अनेकांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे.बिबटे ऊसाच्या शेतात वास्तव्य करत असल्याने नेहमी भल्या पहाटे ऊसतोडणीला जाणे कामगार आता दिवस उजडल्यानंतर तोडणीसाठी जात आहे. पहाटेच होणारा बैलगाड्यांचा खळखळाट यावर्षी तरी हद्दपार झाला आहे.
माका, हिवरे व देडगाव परीसरात तीन ते चार बिबटे आहेत.वन विभागाने सर्वत्र पिंजरे लावले असले तरी त्यात ते न अडकल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.
- अदिनाथ सांगळे, शेतकरी, महालक्ष्मीहिवरे
अधिक पावसाने ऊसाचे पीक मोठे व घनदाट आहे. पीकात गवत व वेली मोठ्या प्रमाणात आहे.
बिबट्याच्या भितीने अंधारतोंडी ऊसतोडणीचे धाडस होत करत नाही.
- सदाशिव उकिर्डे, उसतोडणी कामगार
संपादन : अशोक मुरुमकर