गिरणीही चालवली नाही, ते कारखाना चालविण्यावर बोलतात - पिचड

madhukar-pichad
madhukar-pichad

अकोले ः ‘‘तुमच्यात हिंमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या. शेतकऱ्यांच्या बांधिलकीतून आम्ही काम करतो. यापूर्वी चुकीच्या पद्धतीने कारखाना बंद पडला होता. मात्र तो पुन्हा उभा केला. ज्यांनी पिठाची गिरणी चालवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. ‘अगस्ती’चे कर्ज फेडून तो सक्षमपणे चालवूच,’’ असा विश्‍वास माजी मंत्री व ‘अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. (Let's free the Augusti sugar factory from debt-Pichad)

निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी ‘अगस्ती’चे संचालक मंडळ ‘टोळी’ असल्याचा, तसेच कारखाना शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. जिल्हा सहकारी बँकेकडे अर्ज देऊन ‘अगस्ती’ला कर्ज देऊ नये, अशी मागणी करीत राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. त्यावर (ता. १४) कारखान्यावर पिचड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, मीनानाथ पांडे व सर्व संचालक उपस्थित होते.

सीताराम गायकर यांनी कारखान्याचा अहवाल मांडताना, प्रचंड अडचणीतून आम्ही ‘अगस्ती’ सक्षमपणे चालवत आहोत, असे सांगून, काही मंडळी शेतकरी, बँक व सरकारला चुकीची माहिती देत आहेत. त्यात दोषी आढळले, तर सर्व संचालक जबाबदार राहून भरपाई करू; मात्र खोटे आरोप सहन होत नाहीत, असे सांगितले.

राज्यातील सर्वच कारखान्यांवर कर्ज आहे. ‘अगस्ती’ त्याला अपवाद नाही. आम्ही अध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. विरोधकांनी हिंमत दाखवून कारखाना चालवावा. महेश नवले यांनी, ‘अगस्ती’च्या हिताआड येणारे कोण आहेत, हे शेतकरी सभासदांना कळले असल्याचे म्हटले.

कर्ज म्हणजे कडेलोट नाही

कर्ज म्हणजे कडेलोट नाही. चुकीची व खोटी आकडेमोड करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून काम केले, तर कारखाना बंद पडेल. आम्ही सर्व पक्षभेद विसरून ‘अगस्ती’च्या हितासाठी कटिबद्ध आहोत, असे मीनानाथ पांडे यावेळी म्हणाले. ((Let's free the Augusti sugar factory from debt-Pichad))

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com