दारुविक्री भाेवली...या हाॅटेले-दुकानांचे परवाने निलंबित

Licenses of these hotels suspended
Licenses of these hotels suspended

नगर ः लॉकडाउनच्या काळात बंदी असतानाही दारूची विक्री केल्याच्या आरोपावरून जिल्ह्यातील नऊ हॉटेले- दुकानांचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहेत. त्यांत सात परमीट रूम, एक बिअर शॉपी व एका देशी दारू दुकानाचा समावेश आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ गुन्हे नोंदवून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना अहवाल सादर केला होता. 

लॉकडाउनच्या काळातही जिल्ह्यातील काही हॉटेले व दारूच्या दुकानांनी तळीरामांना दारू विकण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, परवाने कायमस्वरूपी रद्द का करू नयेत, याबाबत लॉकडाउन संपल्यानंतरच्या सात दिवसांत खुलासा करण्याच्या नोटिसा त्यांना बजावण्यात आल्या आहेत.

""शासनाच्या अटी व नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात यापुढे जे दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल,'' असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे. 

गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीप्रकरणी 154 गुन्हे नोंदविले आहेत. त्यात 52 लाख चार हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 59 आरोपींना अटक करून 11 वाहने जप्त केली आहेत. लॉकडाउनच्या काळात आजअखेर जिल्ह्यातील 12 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

तक्रारीसाठी "टोल फ्री' 
अवैध दारूविक्रेत्यांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. त्याच्या टोल फ्री क्रमांकावर (18008333333) तक्रारदार तक्रार नोंदवू शकतात. 


यांचे परवाने निलंबित 
हॉटेल गोविंदा गार्डन, हॉटेल नेचर (दोन्ही संगमनेर), हॉटेल गोल्डन चॅरियट (श्रीरामपूर), हॉटेल धनलक्ष्मी (देवळाली प्रवरा), हॉटेल उत्कर्ष (राहुरी), हॉटेल ईश्‍वर (पारनेर), हॉटेल मंथन (पारनेर), देशी दारू किरकोळ विक्री (संगमनेर), आनंद बिअर शॉपी (राहाता) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com