नगरमधील सेवा निवृत्तांसाठी जीवन प्रमाणपत्र "कॅड पॉइंट'मध्ये उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

केंद्र व राज्य सरकार आणि अन्य आस्थापनांतील निवृत्तांसाठी "डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मिळण्याची सुविधा येथील कॅड पॉइंट संस्थेत उपलब्ध करण्यात आली.

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकार आणि अन्य आस्थापनांतील निवृत्तांसाठी "डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मिळण्याची सुविधा येथील कॅड पॉइंट संस्थेत उपलब्ध करण्यात आली आहे. निवृत्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

ही सुविधा 17 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवृत्तांनी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत आधार कार्ड, पेन्शन पे ऑर्डर बॅंकेचे नाव, खाते क्रमांक व मोबाईल क्रमांकासह "कॅड पॉइंट, आयएसडीटी तळमजला, निर्मल चेंबर्स, लाल टाकी, नगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

केंद्र व राज्य सरकार, संरक्षण विभाग, एलआयसी, माजी सैनिक, टपाल, टेलिफोन, रेल्वे, खासगी कंपन्या, ईपीएफओ, पेन्शनधारक व अन्य आस्थापनांचे सेवानिवृत्त कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life certificate for service retirees in town available at Cad Point