पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband sentenced to life imprisonment for wife's murder

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

श्रीगोंदे - पत्नीस ठार मारल्याप्रकरणी आरोपी सुरेश सिद्धू खटके (वय ३५, रा. चखालेवाडी, पो. बिटकेवाडी, ता. कर्जत) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी जन्मठेप, तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संगीता ढगे यांनी पाहिले. खटके याच्या शेतातील विहिरीत १२ जून २०२० रोजी दुपारी वरील घटना घडली.

खटके याने पत्नी आरती (वय ३०) हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेउन, तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ केली. शेतातील विहिरीतील पाण्यातील वीजपंप बाहेर काढण्याचा बहाणा करून विहिरीजवळ बोलावून पाण्यात ढकलून दिले. पाण्यात बुडवून तिचा खून केला.

सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. माने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Life Imprisonment For Husband In Case Of Wifes Murder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..