नगर जिल्ह्यात कोरोनाचा आजही दहाचा लॉट, कुटुंबांना झाली बाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

संगमनेर तालुक्यातील ०५ यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आहे. 

नगर ः नगर जिल्ह्यात कोरोनाने गिअर बदलला आहे. दररोज दहा ते पंधरा रूग्ण सापडू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ही स्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात मंद झालेली चाल आता झपाट्याने बदलते आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात १० नवीन रुग्ण आढळले. तर ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे ०२, बाधीत रुग्णाचे नातेवाईक आढळून आले. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष, बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.  

संगमनेर तालुक्यातील ०५ यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आहे. 

हेही वाचा - अजित पवार यांचा त्या शेतकऱ्यासोबतचा फोन कॉल व्हायरल

कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक, बाधिताच्या संपर्कातील आहे
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला बाधित आढळली. केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली २८ वर्षीय महिला आहे. जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ५९ (+०२संगमनेर) आहेत.

जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या १४१ झाली आहे. (महानगरपालिका क्षेत्र २३, अहमदनगर जिल्हा ७५, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ३३), एकूण स्त्राव तपासणी  २४३७ झाली आहे. निगेटीव  २२०१, रिजेक्टेड ०२५, निष्कर्ष न निघालेले १५, अहवाल बाकी असलेले ५५ आहेत.

चिमुरडीची कोरोनावर मात

आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय मुलगी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय, संगमनेर तालुक्यातील निमोण येथील व्यक्तीला आज नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lot of ten corona patients in Nagar district even today