Wed, August 10, 2022

सीना धरण अजूनही तहानलेलेच
Published on : 18 July 2022, 5:53 am
मिरजगाव - कर्जत तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सीना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. उपयुक्त जलसाठा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो. कुकडीचे आवर्तन सोडण्याचे साकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांना घातले आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला, तरी सीना धरण तहानलेलेच आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यावेळी भाजपचे नेते संपत बावडकर, अभिजित जवादे, कैलास बोराडे, संदीप बुद्धिवंत, काशिश्वर बुद्धिवंत, सोमनाथ साबळे, लहू वतारे, निवृत्ती जवणे आदी उपस्थित होते.
Web Title: Low Water Storage In Seena Dam Ahmednagar
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..