मध्य प्रदेशातील मजुरांची बस चुकून गुजरातला, चालक म्हणतो, वळवायला जमणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

येथील एसटी आगारातून काल (शनिवारी) दुपारी मध्य प्रदेशातील 27 मजुरांना बसने (एमएच 11 बीएल 9446) रवाना करण्यात आले. मात्र, मजुरांना मध्य प्रदेशऐवजी चुकून गुजरातला सोडण्याचा मेमो बसचालकाकडे देण्यात आला. मेमोनुसार चालक बस घेऊन गुजरातकडे निघाला.

श्रीरामपूर ः परप्रांतीय मजुरांना घेऊन निघालेली बस मध्य प्रदेशाऐवजी गुजरातकडे निघाली. कामगारांनी चालकाला सांगितले. परंतु चालक म्हणाला मला गुजरातला सोडायला सांगितलंय मी तिकडेच सोडणार..बस वळविणार नाही. मग प्रवाशांना वाटलं आता आग्नीतून फुपाट्यात पडतो की काय...

प्रवासी विनंती करीत होते, बस मध्य प्रदेशाकडे वळवा. परंतु चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मला जो आदेश मिळाला आहे. त्यानुसारच मला काम करावे लागेल, असे त्याचे म्हणणे. आणि बसमध्ये तर सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील होते. कोणालाच काहीच सुचेना.

हेही वाचा - पुणे-मुंबईकर मोहाच्या प्रेमात

येथील एसटी आगारातून काल (शनिवारी) दुपारी मध्य प्रदेशातील 27 मजुरांना बसने (एमएच 11 बीएल 9446) रवाना करण्यात आले. मात्र, मजुरांना मध्य प्रदेशऐवजी चुकून गुजरातला सोडण्याचा मेमो बसचालकाकडे देण्यात आला. मेमोनुसार चालक बस घेऊन गुजरातकडे निघाला.

लासलगावहून चांदवड व पुढे महामार्गावर आली असता बस नाशिककडे जात असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. त्यांनी तशी माहिती चालकास दिली; परंतु गुजरातचा मेमो असल्याने बस माघारी घेण्यास चालकाने नकार दिला. 

बसमध्ये उक्कलगाव (ता. श्रीरामपूर, हल्ली रा. खांडवा, मध्य प्रदेश) येथील जालिंदर धनवटे होते. त्यांनी उक्कलगाव येथे संपर्क करून ही माहिती दिली. तेथील नागरिकांनी तहसीलदार पाटील यांना कळविले. पाटील यांनी चालकाशी संपर्क साधल्यावर बस नवापूर, पिंपळनेरमार्गे मध्य प्रदेशाकडे मार्गस्थ झाली. काल (शनिवारी) रात्री पावणेआठ वाजता ती साक्री (धुळे) येथे पोचली होती. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh workers' bus accidentally went to Gujarat