esakal | रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Navnirman Sena is aggressive due to potholes

शहरासह तालुक्‍यातील विविध राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. 

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शहरासह तालुक्‍यातील विविध राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली गाडगेबाबा चौकात शेवगाव-नगर मार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलन केले. 

खड्डे आठ दिवसांत न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला. शेवगाव तालुक्‍यातून पैठण, गेवराई, मिरीमार्गे नगर, पाथर्डी या प्रमुख राज्यमार्गांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अपघातही रोज होतात. वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खड्डे तातडीने बुजवून गैरसोय दूर करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. 

मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, तालुका उपाध्यक्ष संजय वणवे, शेवगाव शहर विभाग अध्यक्ष सुनील काथवटे, उपशहराध्यक्ष संदीप देशमुख, देवा हुशार, विठ्ठल दुधाळ, ज्ञानेश्वर कुसळकर, रवींद्र भोकरे, प्रसाद लिंगे, सुरेश सूर्यवंशी, मंगेश लोंढे, विलास सुरवसे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर