Farmers March : शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ लोणीच्या दिशेने

अकोले येथून दुपारी तीन वाजता किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात झाली
maharashtra tribal farmers march 53km minister radhakrishan vikhe patils hometown
maharashtra tribal farmers march 53km minister radhakrishan vikhe patils hometownsakal

Akole Kisan Long March : अकोले येथून आज (बुधवारी) दुपारी तीन वाजता किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात झाली. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली. मात्र तरीही शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे लाल वादळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या लोणीकडे निघाले आहे.

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आज दुपारी अकोले ते लोणी या ‘लाँग मार्च’ला सुरुवात झाली. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. सद्यःस्थितीत वाढलेल्या उन्हामुळे हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खारघरसारखी घटना घडू नये, असे कारण पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आमची चर्चा सुरू राहील. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास मोर्चा स्थगित करण्याची आंदोलकांची तयारी असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

दरम्यान, किसान सभेचे डॉ. अजित नवले म्हणाले की, ‘‘तळपत्या उन्हात केलेल्या कांद्याला आज ३०० ते ४०० रुपये भाव मिळत आहे. उन्हात कष्ट केलेल्या माऊलीच्या घामाला दाम नाही, याची मात्र सरकारला चिंता वाटत नाही. शेतकऱ्यांच्या जीवाची आम्हालाही चिंता आहे. त्यामुळे तीन वाजल्यानंतर चालण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

अकोले ते लोणी पायी लाँग मार्चमध्ये आपण पूर्णवेळ सहभागी होणार आहेत, अशी माहिती लाँग मार्चला संबोधित करताना ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिली. अखिल भारतीय किसान सभा, सिटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटना यात सहभागी झाल्या आहेत.

किसान सभेच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी प्रदीर्घ चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा.

- राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

हा मोर्चा तीन दिवस पायी चालून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे.

- डॉ. अजित नवले, शेतकरी नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com