राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव जनता हाणून पाडील - बाळासाहेब थोरात

अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष केवळ टिकलंच नाही तर उत्तम काम करीत आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal
Summary

अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष केवळ टिकलंच नाही तर उत्तम काम करीत आहे.

संगमनेर - अनेक नैसर्गिक संकटांना (Natural Crisis) तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) अडीच वर्ष केवळ टिकलंच नाही तर उत्तम काम करीत आहे. हे न देखवणाऱ्या व केवळ प्रसिध्दिसाठी हपापलेल्या काही प्रवृत्ती राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा कांगावा करीत, राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहेत. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाचा डाव जनताच हाणून पाडील असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला. संगमनेरातील प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या नाट्यात दोषी असलेले सापडतील. कोणी गोंधळ घातला हे जनतेला समजते आहे. शिवसैनिकांना भडकावण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र त्यांनी अद्यापही खुप संयमी धोरण स्विकारले आहे. या सर्व प्रकारात शिवसैनिकांकडून कीही चूक झाली असं मला तरी वाटत नाही. त्यांना नैराश्य आलेलं आहे., आमच्या सरकारला अडीच वर्ष झाली आहेत. त्यांनी वर्तवलेले सर्व अंदाज, भविष्य खरं ठरलं नाही. उलट रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार देशातील राज्यांची अर्थव्यवस्था व विकासदराच्या तुलनेत महाराष्ट्राचा इतरांच्या तुलनेत वरचा क्रमांक आहे. अनेक नैसर्गिक संकटे व कोवीडच्या संकटातही विकासाचा वेग कमी होवू दिला नाही. अर्थव्यवस्था भक्कमपणे सांभाळणे हे चांगल्या सरकारचे लक्षण असून, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

राज्यातील भोंगे व हनुमान चालीसा प्रकरणाबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करणे ही राज्याची जबाबदारी आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्ट निवेदन केल्याने वेगळे बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र राज्यघटनेच्या तत्वाचा, समतेच्या तत्वांचा आमचा भोंगा सर्वात मोठ्या आवाजाचा राहील याची आम्ही काळजी घेवू. आमचं तीन पक्षांचं सरकार असलं तरी, आपापल्या पक्षाची चांगली वाढ करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आम्ही ती करतो आहोत. त्याचा परिणाम म्हणून भाजपाची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे, खरी चिडचिड तीच तर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com