Video जामखेडला आधी कोरोना, आता गारा...शेतकऱ्यांना नाही कोणाचा थारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

शिऊर येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ तनपुरे यांचे पाँलीहाऊस वादळी वार्याने अनेकठिकाणी फाटले.लाखो रुपये कर्ज काढून उभारलेले पाँलीहाऊस पीक हाती येण्या अधिच नुकसानीची झळ बसल्याने वाया गेले. मोठे नुकसान झाले.

जामखेड : जामखेड तालुक्यात सर्वदूर वादळी वारा आणि गाराचा पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नाहुली (ता.जामखेड )येथील राजेंद्र जाधव वय-७० हे अंगावर वीज पडल्याने जखमी झाले. सुदैवाने अनर्थ टळला.

तालुक्यातील शिऊर, देवदैठण, नाहूली, तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, खर्डा, सातेफळ, वंजरवाडी,  तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नान्नज, हळगाव, धोंडपारगाव, झिक्री, पाडळी, खुरदैठण, नायगाव, सावरगाव, मोहा, हपटेवाडी, नानेवाडी या परिसरात दुपारी साडेतीन ते पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने थैमान घातले.गोठ्याचे छत व घरावरचे पत्रे उडून गेले. गाराचा पाऊस आणि विजेच्या लखलखाटाने भीतीचे वातावरण निर्माण झाले .

तरडगाव येथील इंदुबाई वाघमारेंच्या घराचे पत्रे  तर बळीराम जावळेंच्या शेळ्यासाठीचा निवारा वाऱ्याने ऊडून गेला. तसेच सेवनिवृत्त मुख्याध्यापक शांतिलाल सानप यांच्या शेतात वीजेच्या तारा तुटल्याने तरडगाव 33 के.व्ही वीज उपकेंद्रातून परिसरातील पंधरा गावांना होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला.

शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका

शिऊर येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ तनपुरे यांचे पाँलीहाऊस वादळी वार्याने अनेकठिकाणी फाटले.लाखो रुपये कर्ज काढून उभारलेले पाँलीहाऊस पीक हाती येण्या अधिच नुकसानीची झळ बसल्याने वाया गेले. मोठे नुकसान झाले.

आंब्याच्या बागेत कैऱ्यांचा खच

तरडगाव येथील प्रगतशील शेतकरी भाग्यश्री सानप यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले. यावर्षी फळ कमी लागल्याचे संकट ओढावले होते. त्यात वादळी वार्याचा दुसऱ्यांदा फटका बसला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच लिंबू बागेतील फळाने लगडलेली झाडे वार्याने उन्मळली, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड, हळगाव परिसरातील पाणीटंचाईवर मात करुन जिवंत ठेवलेल्या  लिंबू बागेचे मोठे नुकसान
तालुक्यातील लिंबोणीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरखेड व हळगाव येथील लिंबोणीची झाड वादळी वार्याने उन्मळले, झाडांची फळगळती झाली. मोठे नुकसान झाले. 

- बापूसाहेब शिंदे,

लिंबू बागायतदार, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to Jamkhed due to rains